• May 1, 2023
  • No Comment

कोणतेही धागेदोरे नसताना २४ तासाच्या आत खुनाचा आरोपी जेरबंद,लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कामगीरी

कोणतेही धागेदोरे नसताना २४ तासाच्या आत खुनाचा आरोपी जेरबंद,लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कामगीरी

    मावळ:मावळ तालुक्यातील आपटी गावाजवळील धामणदरा येथे ४० वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करून मृतदेह नग्न करून ओढ्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार काल शनिवारी (दि. २९) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला होता. या घटनेत मयत व आरोपी यांची कुठलीही माहिती नसताना कौशल्यपूर्वक तपास करत २४ तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या घटनेचा छडा लावण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
    विकास मारुती कोळी (वय २३) व गणपत किसन कोळी (वय ३० दोघे रा. धामनदरा, कातकरी वस्ती, पो. पवनानगर, ता. मावळ) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पांडुरंग विठ्ठल घारे (वय ३८, रा. दुधीवरे, ता. मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तर एक पुरूष (वय अंदाजे ४० ते ४५, रमेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रमेश यास आरोपी मारुती व गणपत या दोघांनी मिळून अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने डोक्यात, चेहऱ्यावर, पाठीत व पायांवर जबर मारहाण करून त्याचा खुन केला होता. तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावरील कपडे काढुन त्याला नग्न केले आणि त्याचा मृतदेह धामणदरा ओढ्यालगत टाकुन दिला होता. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS सत्यसाई कार्तिक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी गुन्ह्याचा तत्काळ छडा आदेश दिले होते. त्यानुसार मयत व आरोपी यांची कुठलीही माहिती नसताना कौशल्यपूर्वक तपास करत २४ तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

    सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, सहा. फौजदार भारत भोसले, युवराज बनसोडे, अजय दरेकर, पो. हवा. नितीन कदम, संतोष शेळके, सिताराम बोकड, अनिल सपकाळ, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस अंमलदार केतन तळपे, राहुल खैरे, सचिन शेलार, स्था. गु. अ. शाखा पुणे ग्रामीणचे सहा. पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सहा. फौजदार प्रकाश वाघमारे, पो. हवा. हेमंत विरोळे, पोलीस मित्र भिमा वाळूज, श्रीकांत घरदाळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक निलेश माने हे करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *