• May 9, 2023
  • No Comment

. ६९ मोबाईल चोरी प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

. ६९ मोबाईल चोरी प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    चोरीला आणि गहाळ झालेल्या ६९ मोबाईलचा शोध घेऊन १८ मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत. ही कामगिरी पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट एकने केली आहे. शहरात मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणानात घडतात. त्यामुळे पोलिसांनी केलेली ही कामगिरी नक्कीच दिलासादायक मानली जात आहे. ६९ मोबाईल चोरी प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी एक जण अल्पवयीन आहे. या कामगिरीमुळे एमआयडीसी भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

    पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयावरून तीन जणांना गुन्हे शाखा युनिट एकने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर ६९ मोबाईल फोन त्यांच्याकडे असल्याचं पुढे आले. त्यातील २३ मोबाईल फोन बाबत जबरी चोरीचे आठ आणि घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. यामध्ये एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील सात, तर सांगवी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.


    आरोपी मागील काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावर काम करायचे. काम सोडून त्यांनी मोबाईल चोरीचे प्रकार सुरू केले. तिघांनी मिळून पिंपरी चिंचवड शहर परिसरातून ६९ मोबाईल फोन चोरी केले. त्यातील २३ मोबाईल फोन प्रकरणी दाखल असलेले नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर ४६ मोबाईल फोनच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे. त्यातील १८ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत.

    ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार (सायबर गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर व तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *