• May 10, 2023
  • No Comment

चंदननगर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेची कारवाई

चंदननगर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेची कारवाई

    पुणे: चंदननगर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून मसाज सेंटरचा मालकासह व्यवस्थापकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    चंदननगर भागातील डेला थाई नावाच्या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली.

    पोलिसांच्या पथकाने कारवाई करुन एका महिलेला ताब्यात घेतले. मसाज सेंटरच्या मालकासह व्यवस्थापकाच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनिमयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अजय राणे, इरफान पठाण, मनीषा पुकाळे, रेश्मा कंक, ओंकार कुंभार आदींनी ही कारवाई केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *