- July 5, 2023
- No Comment
पत्नीची हत्या करून पतीनेही गळफास लावून केली आत्महत्या
नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे पत्नीची हत्या करून पतीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. नागपूरच्या सदर पोलीस ठाणे हद्दीच्या मॉइल वसाहतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर आधी हातोड्याने वार करत तिची हत्या केली. यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या करत आपले जीवन संपविले. सोनिया मंडाले, असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी मृत पतीचे नाव राजेश मंडाले असे आहे.
दरम्यान, राजेह हा कर्करोगाने ग्रस्त होता. त्याच्यावर नागपूरात उपचार सुरू होते. यादरम्यान, त्याने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला आणि त्यातून तिची हत्या केली. तसेच स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. यासंपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.