- July 6, 2023
- No Comment
डॅनी टोळी गजाआड, शिवाजीनगर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी
पुणे :कोयत्याच्या साह्याने कॉलेज परिसरात दहशत निर्माण करू पाहणार्या डॅनी टोळीला पोलिसांनी खाक्या दाखवून कॉलेज परिसरातच धिंड काढली.
कुणाल कानगुडे आणि ओंकार ननवरे ऊर्फ डॅनी या दोघांचा गेल्या काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यातूनच कुणाल याने डॅनीला कोयता दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा सर्व प्रकार कर्वे रस्त्यावरील एका नामांकित कॉलेजमध्ये घडला होता.
याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला कोयता फिरविणार्या कुणाल कानगुडे (वय 19) याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत डॅनी याने आपली टोळी सक्रिय केल्याची माहिती मिळाली. दरम्यान, त्याचा शोध घेत असताना शिवाजीनगर आणि डेक्कन पोलिसांना ते दरोड्याच्या तयारीत असताना नदीपात्रात मिळून आले.
गौतम ऊर्फ लखन अंबादास बनसोडे (वय 29, रा. राजेंद्रनगर), राम विलास लोखंडे (वय 23, रा. नवी पेठ), सुनील बाबासाहेब कांबळे (वय 20, रा. शिवाजीनगर), अश्रू खंडू गवळी (वय 19, रा. दांडेकर पूल), रोहन किरण गायकवाड (वय 19, रा. शिवाजीनगर), रोहित चांदा कांबळे (वय 19, रा. शिवाजीनगर), किरण सिताप्पा खेत्री (वय 20, रा. कात्रज), ओंकार ऊर्फ डॅनी बाळू ननावरे (वय 21, रा. राजेंद्रनगर), श्याम विलास लोखंडे (वय 20, रा. नवी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सर्व आरोपी हे दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी अटक केली. डेक्कन पोलिसांना पेट्रोलिंगदरम्यान पाच जुलै रोजी रात्री जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यानाचे मागील मुठा नदीपात्रात नऊ ते दहा जण दारू पित असून, ते साई पेट्रोल पंप येथे दरोडा टाकण्याचा कट रचत आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून नऊ आरोपींना अटक केली.
त्यांच्याकडे कोयता, स्टील रॉड, मिरचीपूड, नायलॉन दोरी, मास्क, चाकू असे अंगझडतीत मिळून आले आहे. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपयुक्त संदीपसिंग गिल, सहायक पोलिस आयुक्त वसंत कुंवर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस, पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक एस. अहिवळे, पोलिस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार यांनी केली आहे.
कॉलेजमधील तरुणीवर भरदिवसा सदाशिव पेठेत झालेल्या खुनी हल्ल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारी टोळकी, रोडरोमियो यांच्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे स्वतः प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत. डेक्कन आणि शिवाजीनगर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे डॅनी टोळी गजाआड झाली. त्याबद्दत प्रभारी अधिकारी व त्यांच्या स्टाफचे आयुक्तालयात दोघांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.