• August 18, 2023
  • No Comment

पुण्याच्या शिरगावमध्ये गांजा आणि उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या

पुण्याच्या शिरगावमध्ये गांजा आणि उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या

    पुण्याच्या शिरगावमध्ये गांजा आणि उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १४५ इंजेक्शनच्या बाटल्या आणि काही प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. एकूण १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी सुमित गणेश पिल्ले आणि चैतन्य उमेश कुऱ्हाडे या दोघांना शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशा करण्यासाठी आणि बॉडी बिल्डिंगसाठी वापरण्यात येणारे उत्तेजक इंजेक्शन विकण्यासाठी आरोपी सुमित आणि चैतन्य हे येणार असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोन्ही आरोपींना शिरगाव परिसरातूनच सापळा रचून अटक करण्यात आलं. आरोपींकडून बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणलेल्या इंजेक्शनच्या १४५ बाटल्या आणि काही प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेलं इंजेक्शन हे मेफेनटरमाईन सल्फेट असल्याचं समोर आलं असून ते उत्तेजक इंजेक्शन म्हणून ओळखलं जातं. या इंजेक्शनद्वारे अनेकजण नशा करतात. त्याचबरोबर बॉडी बिल्डिंगसाठी देखील हे इंजेक्शन वापरलं जातं. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हे उत्तेजक इंजेक्शन वापरल्यास किंवा कोणाला टोचवल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांच्या टीमने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *