• August 22, 2023
  • No Comment

एका महिलेने अल्पवयीन मुलावर केला अत्याचार

एका महिलेने अल्पवयीन मुलावर केला अत्याचार

    नेहमी पुरुषांकडून महिलेवर अत्याचार केले जात असल्याच्या बातम्या येतात. परंतु पुणे शहरातील हा प्रकार वेगळाच आहे. पुणे शहरात अत्याचाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेने अल्पवयीन मुलावर अत्याचार केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ त्या महिलेने काढला. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी देत शरीरिक संबंध करण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे त्या मुलाला प्रचंड धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुण्यात महिलेकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराचा वेगळा प्रकार घडला आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या महिलेने घराशेजारी राहणाऱ्या १७ वर्षांचा अल्पवयीन मुलास अत्याचार करायला लावला.
    महिला अत्याचार करुन थांबली नाही. या प्रकाराचा तिने व्हिडिओ तयार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलाला जबरदस्ती करत पोलिसात जाण्याची धमकी दिली. माझ्याशी शरीरिक संबंध न केल्यास हे प्रकरण पोलिसांकडे जाईल, असे सांगत तिने संबंध करायला भाग पाडले. शरीर संबंध करतानाचे व्हिडिओही मुलाला काढायला लावलेत. अखेर या प्रकरणी कोंढवा पोलिसांत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *