• August 24, 2023
  • No Comment

नोकरीच्या वादातून मित्रांनीच मित्राला संपवले

नोकरीच्या वादातून मित्रांनीच मित्राला संपवले

    सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात हत्येचे सत्र थांबता थांबत नाही. काही ना काही कारणातून हत्येच्या घटना सातत्याने वाढत आहेत. क्षुल्लक कारणातून पुन्हा हत्याकांड झाल्याचे उघडकीस आले आहे. नोकरीच्या वादातून मित्रांनीच मित्राला संपवल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. शैलेश रमेश मांडगीकर असे हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मित्राची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. राम श्रीराम आणि गोपाळ कोटलपुरे अशी फरार आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

    शैलेश मांडगीकर, राम श्रीराम आणि गोपाळ कोटलपुरे हे तिघेही मजुरीचे काम करत होते. रामच्या सांगण्यावरुन ठेकेदाराने शैलेशला कामावरुन काढून टाकले होते. याचा राग मनात धरुन काल रात्री तिघे मित्र दारु पित असताना शैलेशने राम आणि गोपाळला शिवीगाळ केली. यामुळे राम आणि गोपाळ संतापले आणि त्यांनी शैलेशच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करुन त्याची हत्या केली. यानंतर दोघेही पळून गेले.

    घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. राम हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर गोपाळ हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोघेही कामानिमित्त पुण्यात वाघोली परिसरात राहतात. आरोपींच्या शोधासाठी लोणीकंद वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या वतीने दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *