• August 24, 2023
  • No Comment

हडपसर परिसरातील केरला हॉटेल नावाच्या कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार

हडपसर परिसरातील केरला हॉटेल नावाच्या कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार

    पुणे : हडपसर परिसरातील केरला हॉटेल नावाच्या कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीवर एका कर्मचाऱ्याने एकटेपणाचा फायदा घेत जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच कॅन्टीन मधील आणखी दुसऱ्या कर्मचाऱ्याने संबंधित तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    शहजाद अन्सारी (३०, रा. झारखंड) आणि मोहम्मद सलीम शेख (४३) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही हॉटेल केरला या ठिकाणी कॅन्टीन मध्ये पोळ्या बनवण्याचे काम करते. याच कॅन्टीन मधील कर्मचारी शहजाद अन्सरी याने हॉटेलमध्ये कोणी नसतना तरुणीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन, तिची इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवले. तर हॉटेलमध्ये काम करत असलेला दुसरा कर्मचारी मोहम्मद शेख याने संबंधित तरुणीला,‘मुझे भी चाहिये, मुझे भी करना है’ असे बोलून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जगताप करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *