• September 8, 2023
  • No Comment

मुळशीत जमीन बळका‌वण्यासाठी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या;हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला

मुळशीत जमीन बळका‌वण्यासाठी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या;हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला

    पुणे : मुळशीत जमीन बळका‌वण्यासाठी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी फेटाळून लावला. मुळशीतील दारवली गावातील शेतकरी प्रदीप शिवाजी बलकवडे (वय ३५) यांची जमीन बळकावण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई आणि साथीदारांनी १ ऑगस्ट रोजी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याबाबत बलकवडे यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. देसाई याने जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सरकारी वकील ॲड. विलास घोगरे पाटील, बलकवडे यांचे वकील ॲड. अमेय बलकवडे, ॲड. सतीश कांबळे, ॲड. सूरज शिंदे, ॲड. ऋषीकेश कडू यांनी देसाई याच्या जामीन अर्जास विरोध केला होता
    देसाईविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १७ गुन्हे दाखल आहेत. जातीय तेढ निर्माण करणे, खून, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल झाले आहेत. जमीन बळकावण्यासाठी देसाई आणि साथीदारांनी बलकवडे यांना बेदम मारहाण केली होती. या गुन्ह्यात त्याच्या फरार साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. बलकवडे यांना धमकावण्यासाठी पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता. देसाईने वापरलेले पिस्तूल जप्त करायचे आहे. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती सरकारी वकील ॲड. घोगरे-पाटील आणि फिर्यादी बलकवडे यांच्या वकिलांनी युक्तीवादात न्यायालयाकडे केली. न्यायालयाने देसाई याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *