• December 6, 2023
  • No Comment

हातात पिस्टल घेऊन परिसरात दहशत पसरवणारा आरोपी गजाआड

हातात पिस्टल  घेऊन परिसरात दहशत पसरवणारा आरोपी गजाआड

    पिंपरी : हातात पिस्टल घेऊन परिसरात दहशत पसरवणाऱ्या तरुणाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. हा प्रकार सोमवारी (दि.4) रात्री आठच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर येथील रायगड हॉटेल जवळ घडला आहे.

    आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर (वय-24 रा. मधुकर पवळे शाळेसमोर, ओटास्कीम निगडी, पुणे) याच्यावर आर्म अॅक्ट महाराष्ट्र पोलीस अॅक्ट क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस नाईक बाळासाहेब महालींग नंदुर्गे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदर्श उर्फ छोट्या मगर याने ट्रान्सपोर्टनगर येथील सार्वजनिक रोडवर हतात
    देशी बनावटीचे पिस्टल घेऊन परिसरात दहशत माजवली. हातातील पिस्टल उंचावून मोठमोठ्याने ओरडून लोकांना
    धमकवले. याबाबत निगडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
    त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे.
    पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *