• December 13, 2024
  • No Comment

मोक्का कारवाईनंतर सहा महिने फरार झालेल्या आरोपीला कर्नाटकातून अटक

मोक्का कारवाईनंतर सहा महिने फरार झालेल्या आरोपीला कर्नाटकातून अटक

    पुणे: तरुणावर हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का कारवाईनंतर सहा महिने फरार झालेल्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटकातील रायचूर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. सौरभ तिमप्पा धनगर (वय २४, रा. ताडीवाला रस्ता) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गणेश संजय पोळ (वय २९) हे त्यांचा मुलगा रोनिकला दुचाकीवरुन घेऊन घरी जात होते. त्यावेळी मारुती मंदिर चौकात सौरभ धनगर, आकाश पंडित आणि साहिल वाघमारे यांनी त्यांना अडवले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फायटर, बांबुची काठी, लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करुन गंभीर दुखापत केली. तेव्हापासून सौरभ धनगर फरार झाला होता. पोलिसांनी त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली होती

    पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस अंमलदार बडे, भोकरे यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलीस पथकाने आरोपीला कर्नाटकातील रायचूर येथून ताब्यात घेतले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांच्या पथकाने केली.

    Related post

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…
    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : मार्केट यार्डमधील फळ, भाजीपाला, केळी, पान तसेच कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची शिखर संघटना असलेल्या श्री छत्रपती…
    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने त्रस्त बाजार

    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पूणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *