• December 23, 2024
  • No Comment

बनावट नोटा वटविण्याचा प्रयत्न करणारा सर्राइत गजाआड ! जामनगरच्या तरुणाकडे आढळल्या ५०० व १०० रुपयांच्या बनावट नोटा

    पुणे: बनावट नोटा वटविण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका तरुणाला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या १४२ बनावट नोटा तसेच १०० रुपयांच्या ६१ बनावट नोट्या अशा एकूण ७७ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत.

    गौरव रामप्रताप सविता (वय २४, रा. डिफेन्स काूलनी, जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार लखन गंगाधर शेटे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिराजवळ शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडला.

    याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले की, पोलिसांना एका दुकानदाराने शुक्रवारी रात्री माहिती दिली की, भाजी मार्केट येथे एका जणाकडे नोटा असून त्या बनावट असल्याचा संशय आहे. पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. एका मेडिकल दुकानाच्या बाहेर थांबलेल्या गौरव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या. त्याचबरोबर त्याच्याकडे २ हजार ६५० रुपयांच्या १९ खर्‍या नोटाही सापडल्या. तो जामनगर येथे हेल्पर म्हणून काम करतो. शुक्रवारीच तो पुण्यात आला होता. त्याने या नोटा कोणाकडून घेतल्या त्याच्याकडे कशा आल्या, याचा तपास करण्यात येत आहे. तपासासाठी न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *