• December 23, 2024
  • No Comment

वारज्यातील गोकुळनगरात 15 वाहनांची तोडफोड

वारज्यातील गोकुळनगरात 15 वाहनांची तोडफोड

    वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगर येथील पठार येथील मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या १५ वाहनांवर दगडफेक करुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    याबाबत बाळासाहेब धानप्पा सोनावणे (वय ४८, रा. गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ डिसेंबर रात्री १० ते रविवारी २२ डिसेंबर सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसाहतीचा भाग असलेल्या गोकुळनगर पठारावरील मैदानात अनेक जण आपली वाहने पार्क करतात. रविवारी पहाटेच्या सुमारास टोळक्याने मिनी बस, ट्रक, रिक्षा, टेम्पो, चारचाकी कार, हायवा अशा १५ वाहनांवर दगडफेक करुन त्यांचे नुकसान केले आहे. या घटनेतील एका आरोपीचा पठारावरील रिक्षाचालकाशी वाद झाल्याने त्याने साथीदारासह येऊन ही तोडफोड केली. या तोडफोडीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

    पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख तपास करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *