• December 25, 2024
  • No Comment

उरुळी कांचन येथे पुणे- सोलापूर महामार्गाच्या बाजुला किरकोळ वादातुन चौघांमध्ये हाणामारी; गुन्हा दाखल

उरुळी कांचन येथे पुणे- सोलापूर महामार्गाच्या बाजुला किरकोळ वादातुन चौघांमध्ये हाणामारी; गुन्हा दाखल

    पुणे- सोलापूर महामार्गाच्या बाजुला किरकोळ कारणावरून आपआपसात शिवीगाळ, भांडणे करून एकमेकांना दगडाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चौघांवर आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही घटना मंगळवारी (ता. 24) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली होती.

    रविंद्र प्रभाकर काळे, वय-30, रा. तांबेवस्ती, उरुळी कांचन, गणेश मायप्पा कांबळे, वय-30, रा. दातार कॉलनी, उरूळी कांचन), रवि मल्लिकार्जुन पोतेकर, (वय- 30, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन) महादू दिलीप मंजूळे, (वय-27, रा. शिवार हॉटेलजवळ, उरुळी कांचन, मूळ रा. उमरगा, ता. जि. उमरगा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई धनंजय अनिल भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

    उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हॉटेल जगदंबाच्या समोर सार्वजनिक ठिकाणी रविंद्र काळे, गणेश कांबळे, रवि पोतेकर, महादू मंजुळे हे किरकोळ कारणावरून भांडणे करीत होते. यावेळी किरकोळ बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत होऊन एकमेकांशी पुणे – सोलापूर महामार्गाच्या बाजूला भांडणे करीत हाताने मारहाण करून व शिवीगाळ दमदाटी केली.

    दरम्यान, आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी चौघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *