• December 28, 2024
  • No Comment

शिधापत्रिकाधारकांना दिलासा; रेशनकार्डच्या ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ

शिधापत्रिकाधारकांना दिलासा; रेशनकार्डच्या ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ

    स्वस्त धान्य दुकानात वितरणात होणारी गळती रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

    याची अंतिम तारीख यापूर्वी ३१ डिसेंबर होती, परंतु आता शासनाकडून प्रक्रियेस मुदवाढ देण्यात आली आहे.

    राज्यातील सर्व ग्राहकांचे रेशनकार्डला आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत, तरीदेखील वितरणात २ ते ४ टक्क्यांची गळती असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण १०० टक्के करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. कार्डवरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्ययावत असलेले आधारकार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे स्कॅन करून ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. याची अंतिम तारीख यापूर्वी ३१ ऑक्टोबर होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हर डाऊनमुळे ई-केवायसी व्यवस्था कोलमडली होती.

    त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे ई-केवायसी करता आले नव्हते. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रियेस मुदवाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही सर्व्हर डाउन आणि मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे केवायसी करण्यास अडचणी येत होत्या. अनेक शिधापत्रिकाधारकांचे अजूनही ऑनलाइन केवायसी झालेले नाही. त्यामुळे शासनाने आता पुन्हा एकदा या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. नागरिकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावे. – प्रशांत खताळ, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *