- December 28, 2024
- No Comment
पुन्हा चिमुकलीसोबत अत्याचार, संतप्त नागरिकांनी आरोपीची काढली धिंड

पुणे: पुण्याच्या राजगुरूनगर इथे दोन अल्पवयीन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. आरोपीनं घरासमोर अंगणात खेळणाऱ्या मुलीना गोड आपल्या घरात नेत एकीवर लैंगिक अत्याचार केला होता.
यानंतर त्याने हे प्रकरण दडपण्यासाठी मुलीची गळा दाबून हत्या केली. तर दुसऱ्या मुलीमुळे आपलं बिंग फुटेल या भीतीने दुसऱ्या मुलीचाही आरोपीनं गळा घोटला. ८ आणि ९ वर्षांच्या सख्ख्या बाहिणींची अशाप्रकारे हत्या झाल्याने पुणयात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटकही केली.
राजगुरूनगरची ही घटना ताजी असताना आता पुण्यातील काळेपडळ परिसरात अशीच घटना घडली आहे. इथे एका 23 वर्षांच्या नराधमाने एका सात वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांसह स्थानिक लोकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला आहे. एवढंच नव्हे तर आरोपीच्या कॉलरला पकडून आसपासच्या परिसरात त्याची धिंड काढण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षांची पीडित मुलगी पुण्यातल्या काळे पडळ परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. शुक्रवारी रात्री आरोपीनं पीडित मुलीला एकटं पाहून तिला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आसपासचे लोक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला लाथाबुक्क्यांनी बेदम चोप दिला.
यावेळी एका महिलेनं आरोपीच्या कॉलरला पकडून त्याची धिंड काढली. तर इतर काहींनी धिंड काढतानाही आरोपीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पुढील कार्यवाही पोलीस करत आहेत.





