• December 28, 2024
  • No Comment

कीरकोळ कारणावरून वॉचमनसह त्याच्या पत्नीला मारहाण करत गोळीबार,आरोपी गजाआड

कीरकोळ कारणावरून वॉचमनसह त्याच्या पत्नीला मारहाण करत गोळीबार,आरोपी गजाआड

    पुणे: पुण्यातील थेऊरच्या जय मल्हार हॉटेल जवळ किरकोळ वादातून फायरिंग करण्यात आलीये. प्लॉटिंगच्या वॉचमनने लघवी करणाऱ्या अज्ञात कारमधील टोळक्याला हटकल्यानंतर कार मधील चौघांनी वॉचमन आणि त्याच्या पत्नीला मारहाण करत हवेत फायरिंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

    ही घटना पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. अज्ञातानी दगड आणि हाताने केलेल्या माराहाणीत वॉचमन अक्षय चव्हाण आणि त्याची पत्नी शीतल चव्हाण जखमी झाले आहेत.

    वॉचमनने लघवी करणाऱ्या अज्ञात कारमधील टोळक्याला हटकल्याने घडला प्रकार

    अधिकची माहिती अशी की, प्लॉटिंगच्या वॉचमनने लघवी करणाऱ्या अज्ञात कारमधील टोळक्याला हटकलं. त्यानंतर संतापलेल्या टोळक्याने वॉचमन अक्षय चव्हाण आणि त्याची पत्नी शीतल चव्हाण यांना जबर मारहाण करत गोळीबार केलाय. मारहाण करणाऱ्या अज्ञात कार चालकासह तिघा जणाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भानुदास शेलार अजय मुंडे आणि सतीश उर्फ नाना शेलार या तिघासह एक जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *