• January 1, 2025
  • No Comment

सहा हजारांसाठी गमावली नोकरी; हुक्क्याचे प्रोटेक्शन मनी घेणारा पोलीस कर्मचारी निलंबित

सहा हजारांसाठी गमावली नोकरी; हुक्क्याचे प्रोटेक्शन मनी घेणारा पोलीस कर्मचारी निलंबित

    वानवडी (पुणे): हॉटेलमध्ये सुरू असलेला अवैध हुक्का सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली सहा हजार रुपये घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे.

    हरिचंद्र राजाराम पवार असं निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पवार हे वानवडी पोलिस ठाण्यात बीट मार्शल कर्तव्यावर होते.

    हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्क्यावर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार लुल्लानगर येथील विजेता रुफटॉप हॉटेलमध्ये वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि त्यांच्या पथकाने तीन हुक्का पॉट, डीव्हीआर, एक लॅपटॉप आणि चार मोबाईल जप्त केले. हॉटेलमालक राहुल सुरेखा जैनसिंघाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैनसिंघालच्या मोबाईलमध्ये पोलिस कर्मचारी हरिचंद्र यांचा मोबाईल क्रमांक वानवडी मार्शल नावाने आढळून आला.

    २६ डिसेंबर रोजी पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली तेव्हा हरिचंद्र यांनी जैनसिंघाल याला कॉल केल्याचे दिसून आले. तसेच, जैनसिंघाल याने चौकशीत सांगितले की, पोलिस कर्मचारी हरिचंद्र यांना प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये देतो. हा प्रकार समोर आल्यानंतर वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी पोलिस उपायुक्त कार्यालय परिमंडल-५ यांच्याकडे हरिचंद्र यांनी कर्तव्यात कसुरी केल्याबाबतचा अहवाल पाठविला होता. हरिचंद्र यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *