• January 1, 2025
  • No Comment

नो एंट्रीतून आलेल्या थारमुळे; पोलिसांच्या वाहनाचा मोठा अपघात

नो एंट्रीतून आलेल्या थारमुळे; पोलिसांच्या वाहनाचा मोठा अपघात

    भोसरी: नो एंट्रीमधून अचानक समोर आलेल्या थार गाडीमुळे पोलिसचालकाला शासकीय वाहनाला अचानक ब्रेक लावावा लागला. यावेळी झालेल्या अपघातात पुढील काचेवर धडकून कर्मचारी जखमी झाला. थार वाहनाला असलेल्या फॅन्सी नंबर प्लेटमुळे पोलिसांनी पाठलाग करूनही नंबर मिळविता आला नाही.

    पुणे – नाशिक महामार्गावर मोशी येथे रविवारी (दि. २९) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

    पोलिस अंमलदार सागर यशवंत भोसले (वय ४०) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. काळ्या काचा असलेल्या काळ्या रंगाच्या थार गाडीच्या अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले हे एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यातील बोलेरो कंपनीची टू मोबाइल गाडी चालवत होते. ते पुणे – नाशिक महामार्गावरील मोशी येथे असलेल्या एका हॉटेलसमोर आले असता भरधाव वेगाने रस्ता दुभाजक ओलांडून थार ही गाडी आली. त्यामुळे फिर्यादी भोसले यांना अचानक ब्रेक करावा लागला. यामुळे भोसले यांचे डोके काचेवर आदळले. गाडीची काच फुटून त्यांच्या डोक्याला मार लागला. तसेच डाव्या हाताला व ओठालाही जखम झाली. भोसले यांनी थार गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी रस्त्यावरील दगड पोलिस गाडीच्या खालील बाजूस लागून शासकीय वाहनाचे नुकसान झाले, असे फिर्यादीत नमूद आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *