• January 4, 2025
  • No Comment

पुण्यात कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत; वाहनांची केली तोडफोड

पुण्यात कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत; वाहनांची केली तोडफोड

    पुणे: पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात गुन्हेगारांकडून वाहनांचे खळखट्याकचे प्रकार सुरूच असून, लोहगावनंतर आता धनकवडीत कोयतेधारी टोळक्याने कार तसेच दुचाकींची तोडफोड करून दहशत माजवली.

    गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहन तोडफोडीच्या घटना घडत असून, यामध्ये सर्व सामान्य नागरिक भरडले जात आहेत.

    याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टोळक्यावर गुन्हा दाखल केला असून, प्रकरणात साहिल दुधाणेला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पियुष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाईट्स, मोहननगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, दुधाणे याच्याशी चव्हाणचा वाद झाला होता. त्याचा राग दुधाणे याच्या मनात होता. बुधवारी रात्री आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी चव्हाणला धनकवडी परिसरात अडवले. चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखविला. मला धनकवडीचा भाई म्हणतात, असे सांगून त्याने त्यांच्यावर कोयते उगारले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी धनकवडीतील बसथांब्याजवळ रस्त्यावर लावलेल्या चार कारच्या काचा फोडल्या, तसेच दोन दुचाकींची तोडफोड केली. चव्हाण याला धमकावून आरोपी कारमधून पसार झाले. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार चव्हाण अधिक तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *