• January 6, 2025
  • No Comment

वाकडमध्ये चक्क पान टपरीतून गांजा विक्री, आरोपी गजाआड

वाकडमध्ये चक्क पान टपरीतून गांजा विक्री, आरोपी गजाआड

    पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये पान टपरीत गांजा विक्री करणाऱ्या पान टपरी चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पाच किलो शंभर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पुनीतकुमार विवेक शेट्टी असं अटक करण्यात आलेल्या गांजा विक्रेत्याचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली होती. नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण नशा करतात हे पोलिसांना माहीत होतं. यामुळेच पुनीत कुमार हा त्याच्या साई श्री पान शॉप मधून गांजा विक्री करत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती घेऊन खात्री करून छापा टाकला आणि गांजा विक्रेता पुनीतकुमारला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच किलो शंभर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

    याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बेकायदेशीररित्या गांजा बाळगल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस ऍक्ट कलम ८(क), २०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *