• January 6, 2025
  • No Comment

जागा विकत देतो म्हणत १० जणांना चार कोटी १६ लाखांचा घातला गंडा

जागा विकत देतो म्हणत १० जणांना चार कोटी १६ लाखांचा घातला गंडा

    वाघोली (पुणे): जागा विकत देतो म्हणून सुमारे दहा जणांची चार कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केल्या पकरणी खराडी पोलिसांनी दोन महाठकाना बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार कळताच अनेक जण हवालदिल झाले आहेत.

    त्यांनी कित्येक जणांना अजून गंडा घातल्याची शक्यता खराडी पोलिसांनी व्यक्त केली आहे.

    ईश्वर गहिनीनाथ बुधवंत ( वय ३३ वर्षे रा. एच ९४ फॉरिस्ट काउंटी सोसायटी, खराडी ), स्वप्निल बाळासाहेब पवार ( रा. पोंधवडी ता. इंदापुर जि पुणे ) असे फसवणूक करणाऱ्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी अविनाशकुमार लक्ष्मणकुमार बेहरा ( वय ३२ वर्षे, रा. केशवनगर ) यांनी फिर्याद दिली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, अक्षय आनंदकुमार ललगुणकर, संजय गोवर्धन कादे, हितेश अशोक गुमर असे स्वतःला घर बांधण्यासाठी वाघोली, खराडी, पुणे परिसरात जागा शोधत असताना त्यांची ओळख ईश्वर व स्वप्नील यांच्याशी झाली.

     

    या दोघांनी चौघांकडून रोख रक्कम, चेक, आर टी जी एस द्वारे सुमारे एक कोटी ११ लाख रुपये घेतले. त्यांना जागा देतो असे सांगितले. मात्र जागाही दिली नाही व पैसे ही परत दिले नाही. अन्य सहा जणांकडून सुमारे तीन कोटी पाच लाख रुपये घेवून त्यांची ही फसवणूक केली. मी पैसे ही देणार नाही व जागाही देणार नाही तुला काय करायचे ते कर अशी ईश्वर याने अविनाश यांना धमकी दिली. यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली.

    या दोघांनी सुमारे १० जणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकाराने वाघोली, खराडी परिसरात खळबळ माजली असून अजून अनेक जणांना त्यांनी गंडा घातल्याची शक्यता आहे. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व पथकाने ही कामगिरी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *