• January 8, 2025
  • No Comment

शुभदा कोदारेचा धारदार शस्त्राने खून; कोयत्याने सपासप वार, धक्कादायक कारणं आलं समोर

शुभदा कोदारेचा धारदार शस्त्राने खून; कोयत्याने सपासप वार, धक्कादायक कारणं आलं समोर

    पुणे: साडे चार लाखांच्या आर्थिक व्यवहारातून तरुणीची धारदार शस्त्राने वार करुन हत्यापुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कर्जाच्या वादातून बीपीओमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची तिच्या सहकाऱ्याने हत्या केली.

    धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला बीपीओ कर्मचारीचा रुग्णालयात मृत्यू झाला. पुण्यात मंगळवारी (7 जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली. बहुराष्ट्रीय बीपीओ कंपनीच्या पार्किंगमध्ये घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून महिलेचा तिच्या कार्यलयातील पुरुष सहकाऱ्याने तिच्यावर अनेकवेळा हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यामुळे महिलेचा मृत्यू झाला.

     

    पुणे, रामवाडीत येथील नामांकित कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकारी तरुणीवर धारधार हत्याराने केलेल्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आर्थिक वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही या कंपनीत अंकाऊटिंग विभागात काम करत होते. साडे चार लाख रुपये तरुणीला हात उसने म्हणून दिले होते. त्यावरून त्यांच्यात वादावादी होती.

     

    मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील बहुराष्ट्रीय बीपीओच्या पार्किंगमध्ये 7 जानेवारीला, सायंकाळी ६.१५ च्या सुमारास ही घटना घडली. शुभदा शंकर कोदरे (वय 28, रा. कात्रज) असे पीडित महिलेचे नाव आहे. कृष्णा सत्यनारायण कनोजा (३०) असे हल्लेखोराचे नाव असून तो शिवाजीनगर येथील रहिवासी आहे. हिंमत जाधव, डीसीपी झोन-4, पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासातून समोर आले आहे की पीडित आणि हल्लेखोर दोघेही एकाच बहुराष्ट्रीय बीपीओ (डब्ल्यूएनएस ग्लोबल) मध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होते.

     

    तरुणी मूळची चिपळून येथील आहे. ती कुटूंबियासोबत साताऱ्यात स्थाईक झाली होती. तर आरोपी कृष्णा हा मुळचा उत्तरप्रदेशातील आहे. तो गेल्या दहा वर्षांपासून पुण्यातच आहे. त्यामुळे त्याला मराठी व्यवस्थित बोलता येते. दरम्यान, दोघेही डब्ल्युएनएस या कॉल सेंटर असलेल्या कंपनीत काम करत होते. दरम्यान, त्यांच्यात काही पैशांची देवाण-घेवाण झाली होती. त्यावरून त्यांच्यात वादावाद देखील होते. तरुणीकडून कृष्णा पैसे मागत होता. मंगळवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास तरुणी काम संपवून पार्किंगमध्ये आली. ती तिच्या वाहनाने जाणार असतानाच तेथे थांबलेल्या कृष्णाने तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने थेट भाजी कापण्याच्या चाकूने तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेतली. तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. येरवडा पोलिसांना घटनेची माहिती त्यांनी तेथे धाव घेतली. पोलीस उपायुक्त हिमत जाधव व अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच आरोपी कृष्णा याला ताब्यात घेतले. त्याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *