• January 16, 2025
  • No Comment

छत्रपती संभाजीनगर येथे एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या

छत्रपती संभाजीनगर येथे एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या

    छत्रपती संभाजीनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 19 वर्षीय विद्यार्थ्याची अज्ञातांनी गळा चिरुन हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाचा मृतदेह बंद असलेल्या फ्लॅटमध्ये सापडला आहे. प्रदीप विश्वनाथ निपटे वय 19 असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरात एका बीसीएसच्या विद्यार्थ्याची फ्लॅटमध्ये गळा चिरून हत्या केली. प्रदीप निपटे या विद्यार्थ्यांची अज्ञातांनी निघृण हत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. प्रदीपच्या हत्येला कॉलेजमध्ये झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी महाविद्यालयातील मुलांची आणि प्रदीपच्या मित्रांमध्ये वाद झाले होते. तू एकटक का पाहतो, कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. संक्रांती रोजी रात्री त्याचे मित्र बाहेर गेलेले असताना मारेकऱ्यांनी त्याच्या फ्लॅटवर जात त्याला गळा चिरून मारून टाकले. मंगळवारी रात्री ११.३० वाजता उस्मानपुऱ्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

    मूळ माजलगावचा असलेला प्रदीप देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. एक मावसभाऊ व अन्य तीन मित्र, असे सोबत भाजीवालीबाई पुतळ्याजवळील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. मंगळवारी महाविद्यालयातून सर्व जण परतले. संध्याकाळी त्याचा भाऊ व अन्य मित्र बाहेर गेले होते. प्रदीप मात्र एकटाच फ्लॅटवर थांबला होता. रात्री १० वाजता ते खोलीवर परतले. तेव्हा प्रदीपचा गळा कापलेल्या अवस्थेत होता. तर प्रदीप रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्याच्या मित्रांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *