• January 17, 2025
  • No Comment

पुण्यात चोरट्यांचा धुमाकुळ; येरवड्यात एकाला चाकूच्या धाकाने लुटले

पुण्यात चोरट्यांचा धुमाकुळ; येरवड्यात एकाला चाकूच्या धाकाने लुटले

    पुणे: पुणे शहरात सोनसाखळी चोरट्यांनी ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशी महिलांना टार्गेट केलेले असताना चतु:शृंगी आणि वानवडीत देखील दोन घटना घडल्याचे समोर आले आहे. तर यासोबतच येरवड्यात एकाला चाकूच्या धाकाने लुटण्यात आले आहे.

    याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात 24 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील २ चोरट्यावर गुन्हा नोंदवला आहे. ही घटना मकरसंक्रांतीच्या दिवशी घडली आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार या वडारवाडी परिसरात राहण्यास आहेत. सेनापती बापट रस्त्याने त्या पहाटे साडे पाचच्या सुमारास पायी जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची सोन साखळी हिसकावून पोबारा केला. त्यांनी आरडाओरडा केला, परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. तर वानवडीमधील घटना तीन दिवसांपूर्वी म्हणजे 13 जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांत 44 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. दुपारी बाराच्या सुमारास ते घोरपडी बाजार आले होते. तेव्हा त्यांच्या विरुद्ध दिशेने येऊन गळ्यातील सोन साखळी हिसकावून नेली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *