• January 22, 2025
  • No Comment

पुण्यातील तृतीयपंथीयाची विष पिऊन आत्महत्या

पुण्यातील तृतीयपंथीयाची विष पिऊन आत्महत्या

    पुणे: पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका तृतीयपंथीयाने प्रेमात फसवणुक झाल्या कारणास्तव विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तृतीयपंथीयाचे नाव रुपा देवी माहेश्वरी असून तो पुण्यातील एका गावातील रहिवासी होता.

    तृतीयपंथी रुपाला जयपूरचा तरुण आवडला होता. पण, प्रियकाराने साथ सोडली. तो धक्का रुपाला पचवता आला नाही. थेट कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली.

     

    राजस्थान येथील जयपुरमध्ये सांभर परिसरात 14 जानेवारीला एका तृतीयपंथीचा मृतदेह मिळाला. यावेळी मृतदेहाजवळ एक कीटकनाशकटी बॉटल होती तर एक सुसाइड नोट सापडली. तसेच, तृतीयपंथीजवळ पुण्याहून जयपूरचे विमान तिकिटदेखील मिळाले. मोबाईलवरुन तृतीयपंथीची ओळख पटली.

     

    तृतीयपंथीयाला जयपुरचा तरुण आवडला होता. दोघांमध्ये तसे प्रेमसंबंधदेखील निर्माण झाले होते. जवळपास दोघे 3-4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. तृतीयपंथी नेहीमी प्रियकराला भेटण्यासाठी जयपूरला जायचा. दरम्यान, तृतीयपंथीयाला आपला प्रियकर आपल्याला धोका देत असल्याचे लक्षात आले. संशय येताच तृतीयपंथीने थेट जयपूर गाठले. पण दोघांची भेट झाली नाही.

     

    सोमवारी 13 जानेवारीला तो सायंकाळी विमानानं जयपूरला पोहचला. सांभारस्थित प्रियकराच्या घराबाहेर खुप वेळ थांबला. वाट पाहून तृतीयपंथीने आपल्या प्रियकराला आवाजदेखील दिला. पण तो काही केल्या बाहेर आला नाही. त्यानंतर 14 जानेवारीला प्रियकराच्या घरापासून काही अंतरावर तृतीयपंथीयाचा मृतदेह आढळून आला. कीटकनाशक पिण्यापूर्वी त्यानं सुसाईड नोट लिहून ठेवली होती. जी पोलिसांच्या हाती लागली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीय एके दिवशी सांभरला गेला होता. त्यावेळी त्याची तिथे एका तरुणाशी भेट झाली. दोघांमध्ये मैत्री झाली त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झालं. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी तृतीयपंथीय नेहमी पुण्याहून जयपुरला जायची. तिच्या प्रियकराच्या कुटुंबाला ही गोष्ट कळताच घरच्यांनी त्याला तृतीयपंथीयसोबत बोलणं बंद करण्यास सांगितले. तो बोलयाचं बंद झाला. त्यानंतर तृतीयपंथीयाला संशय आला. भेटण्यासाठी थेट सांभार गाठले. पण प्रियकराने भेटण्यास नकार दिला. हा धक्का तृतीयपंथीयाला पचवता आला नाही. त्याने थेट टोकाचं पाऊल उचलत स्वतःला संपवले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *