• January 22, 2025
  • No Comment

लांछनास्पद! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न; हडपसरमधील धक्कादायक प्रकार

लांछनास्पद! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न; हडपसरमधील धक्कादायक प्रकार

    हडपसर (पुणे): हडपसर परिसरात 17 वर्षीय मुलगी घरात एकटी असताना दोघांनी अचानक घरात शिरून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांनी तिचे तोंड, डोळे रुमालाने बांधून ठेवले. त्यानंतर तिच्या हाताला चिकटपट्टी बांधून तिला खाली पाडून तिच्यावर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न केला.

    याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

    सदर मुलगी ही तिच्या राहत्या घरी असताना, तिचे पालक हे कामाच्या निमित्ताने घराबाहेर गेले होते. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती घरात जबरदस्तीने शिरल्या. त्यांनी मुलीला धमकावून बांधून ठेवले व तिच्या तोंडावर रुमाल बांधला.

    त्यानंतर आरोपी तिला म्हणाले, तुझ्या बापाने माझा अपमान केला आहे, त्याला जास्त माज आहे, आमच्या मागून तो पुढे गेला आहे, तुझे लग्न कसे होते ते मी बघतोच, अशी धमकी देऊन शिवीगाळ करू लागले. त्यानंतर त्यांनी मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्न करत तिच्या शरीराला आक्षेपार्ह स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तिने प्रतिकार केला असता दोघे जण पळून गेले.

    याप्रकरणी हडपसर पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *