• February 1, 2025
  • No Comment

अनैतिक संबंधातून पुणे महापालिकेतील एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा कोयत्याने वार करुन खून

अनैतिक संबंधातून पुणे महापालिकेतील एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा कोयत्याने वार करुन  खून

    पुणे : अनैतिक संबंधातून पुणे महापालिकेतील एका कंत्राटी कर्मचारी तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना कोथरूड भागात घडली. याप्रकरणी कोथरूडपोलिसांनी तीन ते चार जणांना ताब्यात घेतले. राहुल दशरथ जाधव (३०, रा. उंबरे, ता. भोर, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तीन ते चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, जाधव याचा भाऊ केतन  याने याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सफाई विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले. महिलेचे राहुल याच्याशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण महिलेच्या मुलाला लागली होती. आरोपी मुलगा आणि त्याच्या मित्रांनी संगनमत करुन राहुलचा खून करण्याचा कट रचला.

    कोथरूडमधील शास्त्रीनगर भागातील सागर काॅलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीस्वार राहुल गुरुवारी सायंकाळी थांबला होता. त्या वेळी आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी त्याला गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या राहुल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक चेतन धनवडे पुढील तपास करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *