• February 15, 2025
  • No Comment

उरुळी कांचनच्या तरुणाला हातभट्टी दारूची वाहतूक करताना अटक, लोणी काळभोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

उरुळी कांचनच्या तरुणाला हातभट्टी दारूची वाहतूक करताना अटक, लोणी काळभोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    उरुळी कांचन: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी निघालेल्या एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात शुक्रवारी (ता.14) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केली आहे.

    या कारवाईत पोलिसांना 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.

    संजय तुकाराम कसबे (वय 27, रा.पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल कर्डिले यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार राहुल कर्डिले हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कर्डिले हे नेहमीप्रमाणे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. गस्त घालत असताना, त्यांना पुणे-सोलापूर महामार्गावरून अवैध हातभट्टी दारूची वाहतूक होणार आहे, अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.

     

    मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी माळीमळा परिसरात सापळा रचला. तेव्हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी एक दुचाकी पकडली. त्या दुचाकीस्वारांच्या पिशव्यांची तपासणी केली असता, दोन पिशव्यांमध्ये 70 लिटर हातभट्टी दारू आढळून आली. पोलिसांनी या कारवाईत 7 हजार रुपयांची दारू व 50 हजार रुपयांची स्प्लेंडर कंपनीची दुचाकी असा 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर संजय कसबे याला अटक करून त्याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार विलास शिंदे व पोलीस अंमलदार राहुल कर्डिले यांच्या पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *