• February 18, 2025
  • No Comment

८० वर्षीय महिलेची नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या, महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत

८० वर्षीय महिलेची नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या, महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत

    पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये एका ८० वर्षाच्या महिलेने नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन महिलेचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला आहे.

    या महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेने पवना नदीवरील लंडन ब्रिजवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नदीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

    पवना नदीमध्ये उडी मारुन स्वत:चा जीव संपवणाऱ्या या ८० वर्षाच्या महिलेची ओळख पटवण्याचे काम रावेत पोलीस करत आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर अहवालाच्या मदतीने या महिलेचे नाव शोधण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत. या आत्महत्येच्या प्रकरणामुळे पिंपरी चिंचवड शहर परिसरात खळबळ माजली आहे. वायसीएम रुग्णालयातून शवविच्छेदनाचा अहवाल येण्याची वाट पोलिस पाहत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *