• March 6, 2025
  • No Comment

पुणे : नंदु नाईकच्या मटका अड्ड्यावर खडक पोलिसांची धडक कारवाई, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून इमारत जमीनदोस्त

पुणे : नंदु नाईकच्या मटका अड्ड्यावर खडक पोलिसांची धडक कारवाई, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून इमारत जमीनदोस्त

    पुणे: मटका किंग नंदकुमार नाईक याच्या शुक्रवार पेठेतील मटका अड्ड्यावर खडक पोलिसांनी धाड घालून मटका घेणार्‍या दोघा रायटरला पकडले. त्याचवेळी नंदकुमार नाईक जेथे मटका अड्डा चालवत होता, ती इमारत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडून टाकली.

    अविनाश प्रमोद पाठक (वय ४९, रा. शुक्रवार पेठ), सुरज जोखन सहाणी (वय ३६, सध्या रा. रौनक हॉटेल, शुक्रवार पेठ, मुळ रा. हडकोडा, निसलवर, जि. महाराजगंज, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    याबाबत पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मटका अड्डा चालविणारा नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७२, रा. शुक्रवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    मटका किंग नंदकुमार नाईक याच्या शुक्रवार पेठेतील या मटका अड्ड्यावर खडक व गुन्हे शाखेने आतापर्यंत किमान ७ ते ८ वेळा कारवाई केली आहे. असे असतानाही तो काही दिवसांनी पुन्हा मटका अड्डा सुरु करताना दिसून येत होता.

    खडक पोलीस ठाण्याचे पोलीस पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांना माहिती मिळाली की, नंदकुमार नाईक याचा मटका अड्डा पुन्हा सुरु झाला आहे. त्यानुसार खडक पोलीस पथकाने मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता रौनक हॉटेलसमोर सापळा रचून दोघांना पकडले. ते कोर्‍या कागदावर आकडे लिहून घेऊन चिठ्ठ्या तयार करुन ग्राहकांना देत़ जुगाराचे आकड्यावर पैसे लावून लोकांकडून पैसे घेऊन त्यांना चिठ्ठ्या देत होते. त्यांना पकडल्यावर त्यांनी नंदकुमार नाईक याच्या सांगण्यावरुन या चिठ्ठ्या घेत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून १२९० रुपये, मोबाईल व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पोलीस हवालदार पेरणे तपास करीत आहेत.

    महापालिकेने नंदकुमार नाईक याचा मटक्याचा अड्डा चालत असलेल्या इमारतीवर कारवाई करुन ती जमीनदोस्त केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *