- September 20, 2022
- No Comment
क्रेडीट कार्डचे तोटे, फक्त एक फोन आणि बँक अकाउंट रीकाम
रावेत: क्रेडिट कार्ड केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलेकडून क्रेडीट कार्डचे डिटेल्स ऑनलाइन माध्यमातून घेऊन त्याआधारे 17 हजार 500 रुपयांची फसवणूक केली.
ही घटना शुक्रवारी (दि.16) रावेत येथे घडली. याप्रकरणी महिलेने रोहित शर्मा नावाच्या व्यक्ती विरोधात रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आरोपीने फिर्यादी महिलेला फोन केला आणि त्यांच्या एसबीआय क्रेडिट कार्डचे केवायसी अपडेट करण्याचे सांगितले. महिलेला विश्वासात घेऊन फोनवर एक लिंक पाठवली आणि त्यात क्रेडिट कार्डची सर्व माहिती भरण्यास सांगितले. महिलेने माहिती भरली असता आरोपीने त्या माहितीच्या आधारे महिलेच्या क्रेडिट कार्डवरून 17 हजार 500 रुपये काढून घेत फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.