- September 20, 2022
- No Comment
पिंपरी: मुक्या जनावरांची अमानुष पणे हत्या
पिंपरी: गुंगीचे औषध देऊन मोकाट जनावरांना कत्तलीसाठी गाडीमध्ये घालून त्यांची चोरी करण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार पिंपरी येथील सुदर्शन चौक येथे उघडकीस आला आहे.
चोरी करणाऱ्या समाजकंटकांनी अगदी तीन ते चार वर्षाच्या बैलाला देखील भूल दिली. त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याला जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी आता गोरक्षकांकडून करण्यात येत आहे.
पिंपरी येथे तीन ते चार मोकाट जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने भुलीचे इंजेक्शन देऊन स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये गाय व वासराला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती गोरक्षक प्रदिप खराडे, गणेश मंजाळ व अक्षय खंडागळे यांना मिळाली. गोरक्षक घटनास्थळी पोहचले. यावेळी वासराची परिस्थिती गंभीर होती. याबाबतीत पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे तसेच मानद पशु कल्याण अधिकारी अभिजीत चव्हाण यांच्यासोबत गोरक्षक प्रदीप खराडे, गणेश मंजाळ व अक्षय खंडागळे यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांच्या मार्फत कोणतेही ठोस पाऊल उचलले न गेल्यामुळे बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असे अभिजीत चव्हाण यांनी सांगितले.
या संतापजनक व दुखःद घटनेनंतर पिंपरीतील गोरक्षकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली असून पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच गोरक्षकांनी पालिकेच्या गेटसमोर मृत बैलाला ठेऊन आंदोलन केले. या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री अभिजीत शिंदे, मानद पशु कल्याण अधिकारी अभिजीत चव्हाण, अमित कुदळे, गणेश मंजाळ, प्रतीक खराडे, दीपक मुंगसे, नितीन कुदळे, विठ्ठल जाधव, मंगेश नढे, ऋषी ढाकणे, महेश आढाव हे गोरक्षक उपस्थित होते.