- September 20, 2022
- No Comment
बांधकाम पूर्ण न करता, पैसे हडपणारया बिल्डर वर गुन्हा दाखल
भोसरी: ठरल्याप्रमाणे बांधकाम करून न देता तसेच पैसे घेऊन सेल डीड करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी मे. राजमाता प्रमोटर्स तर्फे विकसक हितेश जवाहर जेठानी आणि भागीदार जवाहर हिरालाल जेठानी (दोघे रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रकाश नारायण हारके (वय 41, रा. मोशी प्राधिकरण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 28 जून 2012 ते 17 सप्टेंबर 2022 या कालावधीत स्वस्तिक इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स, एमआयडीसी भोसरी येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींनी स्वस्तिक इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्समध्ये दोन गाळे घेतले होते. त्याचे 46 लाख रुपये फिर्यादी यांनी आरोपींना दिले. पैसे घेऊनही आरोपींनी सेल डीड करून दिले नाही. ते करून देण्यासाठी टाळाटाळ केली. दोन्ही गाळ्यांचे रितसर भोगवटा प्रमाणपत्र न देता ताबा दिला. प्राधिकरणाच्या मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केले नाही. इमारतीमधील कॉमन पार्किंग, मोकळ्या सामायिक जागा या वेगवेगळ्या गाळाधारकांना ओपन स्पेस दाखवून त्याची स्वतंत्रपणे विक्री केली. सोसायटी स्थापन करण्यासाठी दिलेल्या दोन लाख रुपयांचा हिशोब दिला नाही. कॉमन लाईट मीटर फिर्यादी यांच्या गाळ्याचा असल्याचे दाखवले. पिण्याचे पाणी, अग्निशमन व्यवस्था उभारली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.