- September 21, 2022
- No Comment
सासरच्यां कडुन विवाहितेचा छळ, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
आळंदी: तू व तुझ्या नवऱ्याने आमच्या घरात रहायचे नाही म्हणून दीर, सासऱ्याने महिलेला मारहाण करत जबरदस्तीने घराला कुलुप लावत घराचा ताबा घेतला.
याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून सासरे, दोन दीर व दोन महिला आरोपी विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना तू व तुझ्या नवऱ्याने घरात रहायचे नाही, म्हणत शिवीगाळ करत घरातील बाथरूम वापरण्यास आरोपींनी मनाई केली. तसेच, शिवीगाळ केली. यावेळी हे माझे देखील घर आहे मी जाणार नाही असा विरोध फिर्यादी यांनी केला असता आरोपींनी त्यांना मारहाण देखील केली. यावरून फिर्यादी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दिली.
पोलीस ठाण्याहून फिर्यादी घरी परतल्या असता सासऱ्याने घराला कुलुप लावून घराचा ताबा घेत फिर्यादी यांना घराची चावी दिली नाही. घरातील सामान घेण्यास गेल्याही फिर्यादी व त्यांच्या पतीला तू इथ आलास तर तुझे सामान घराबाहेर फेकुन देईन अन तुला स्थानिक गुंडाकडून मार बसवेल अशी धमकी दिली. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.घेतला.