- September 21, 2022
- No Comment
अवैध गुटखा टपऱ्यांवर कारवाई, गुटखा जप्त करुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
जुनी सांगवी: गुटखा विक्री प्रकरणी सांगवी परिसरात अन्न प्रशासन विभाग आणि सांगवी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. यात चार टपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून साडेतीन हजारांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. ही कारवाई शितोळे नगर, जुनी सांगवी येथे करण्यात आली.
अन्न व सुरक्षा अधिकारी राहुल खंडागळे (वय 37) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनी (पूर्ण नाव नमुद नाही, रा. जुनी सांगवी), श्रीराम शंकरराव ढमाले (वय 60, रा. जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा विभागाला जुनी सांगवी परिसरात शासनाने प्रतिबंधती केलेला गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्न प्रशासन विभाग आणि सांगवी पोलिसांनी जुनी सांगवी येथील शितोळे नगर येथील चार टपऱ्यांची तपासणी केली. त्यातील एका टपरीमध्ये तीन हजार 494 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे पुढिल तपास करीत आहेत.