- September 23, 2022
- No Comment
हडपसर: अंडी उधार दिली नाही म्हणून विक्रेत्याला बेदम मारहाण
हडपसर: अंडी उधार देण्यास नकार दिल्याने अंडी विक्री करणाऱ्याला बेदम मारहाण करत त्याच्या दुकानाची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील वेताळबाबा वसाहत या ठिकाणी हा प्रकार घडला.
याप्रकरणी बाळू भीमराव डोके (वय 37) याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. आयुब असलम शेख (वय 27) यांनी ही तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीतळ परिसरातील वेताळबाबा वसाहत या ठिकाणी फिर्यादी यांचे चिकन व अंड्याचे दुकान आहे. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बाळू डोके त्या ठिकाणी आला आणि त्याने फिर्यादी यांना उधार अंडी मागितली. फिर्यादी याने ती देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीस मारहाण केली. त्यानंतर दुकानातील अंडी फोडून साहित्याची तोडफोड करून मोठे नुकसान केले.