- September 23, 2022
- No Comment
हडपसर:कामानिमित्त महिलेला बाहेर नेऊन केले वारंवार बलात्कार,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
हडपसर: कंपनीच्या कामानिमित्त सहकारी महिलेला सुरत येथे घेऊन गेल्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर या महिलेच्या पतीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून त्यांची बदनामी केली. 34 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली असून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयंक हरीशभाई जोगी (वय 38) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील मगरपट्ट्यात असलेल्या एका नामांकित कंपनीत आरोपी आणि फिर्यादी काम करत होते. आरोपीने फिर्यादीला कंपनीच्या कामानिमित्त सुरत या ठिकाणी नेले होते. त्या ठिकाणी आरोपीने फिर्यादीला नोकरीस लावले आहे या कारणाने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्यांना नोकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडून पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीच्या मोबाईल क्रमांकावर वेगवेगळे अश्लील मेसेज पाठवून त्यांची बदनामी केली.
संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.