- September 22, 2022
- No Comment
मोक्काच्या गुन्ह्यामधील दोन अट्टल गुंड जेरबंद, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेची कामगिरी
पुणे: मोक्काच्या गुन्ह्यामधील गेल्या दोन वर्षापासून फरारी आरोपीस अटक करण्यात पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेला यश.
समीर अशोक शिंदे (वय २९ राहणार रिहे तालुका मुळशी जिल्हा पुणे) व ज्ञानेश्वर उर्फ माऊली पडळघरे (वय ३४ राहणार पडळघरे वाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मा. डॉ अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्या मधील फरारी व पाहिजे असलेले आरोपी पकडण्याचे आदेश दिले.पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह गस्त करीत असताना पथकाला पौड पोलीस स्टेशन मोक्काच्या गुन्ह्यातील गेल्या २ वर्षापासून फरारी असलेले आरोपी
पडळघरेवाडी रिहे परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून या दोघांना पडळघरे वाडी परिसरातून ताब्यात घेऊन मोठ्या शिताफीने आरोपीस अटक केले.
पुढील कायदेशीर कारवाई साठी पौड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर ची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील हवेली विभाग, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ पौड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद
विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, ईश्वर जाधव, पोलीस हवालदार विशाल भोरडे, मोसिन शेख या पथकाने केली. तांत्रिक मदत सायबर पोलीस स्टेशनचे सुनील कोळी व चेतन पाटील यांनी केली.