तरुणाने मोबाईल ॲप वरून लोन घेतल आणि करावि लागली आत्महत्या
- क्राईम
- September 22, 2022
- No Comment
पुणे: मोबाईल ॲप वरून लोन घेतल्यानंतर सतत येणाऱ्या धमक्यामुळे वैतागलेल्या एका 25 वर्षे तरुणाने आत्महत्या केली आहे. सोहेल शेख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
मयत मुलाच्या वडिलांनी त्याप्रकरणी तक्रार दिली असून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सोहेल शेख या तरुणाने मोबाईल ॲप वरून कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी या तरुणाला सातत्याने बदनामी करण्याची धमकी दिली जाते. एक कर्ज फेडण्यासाठी त्याने दुसरे लोन घेतले होते.त्यामुळे याची परतफेड करण्यासाठी त्याला सातत्याने फोनवरून बदनामी करण्याची धमकी दिली जात होती. या त्रासाला कंटाळून अखेर सोहेल शेख यांनी आत्महत्या केली आहे. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.