- September 23, 2022
- No Comment
आळंदी:पायी चालणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र केले लंपास
आळंदी: आळंदी येथे पायी चालणाऱ्या महिलेचे मंगळसुत्र हिसकावण्यात आले आहे. ही घटना नगर परिषद चौकाजवळ घडली. याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पायी त्यांच्या घरी जात होत्या. यावेळी पॅशन प्रो या कंपनीच्या दुचाकीवर दोन चोर आले व त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 70 हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावली. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.