- September 25, 2022
- No Comment
पुणे: पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पन्नास हुन अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पुणे: देश विघातक कृत्य केल्याच्या संशयावरून केंद्रीय तपास यंत्रणेने (PFI Pune) पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या देशभरातील कार्यालयावर छापा.
यामध्ये शंभरहून अधिक जणांना एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातही याप्रकरणी छापा टाकण्यात आला होता. या ठिकाणाहून दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाला निश्चित करण्यासाठी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. याप्रकरणी आता बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, रा. शिवनेरी नगर कोंढवा) यांच्यासह 60 ते 70 इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीआरपीसी 41/1 नुसार या सर्वांना नोटीस दिली आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमाव जमा करून एनआयए, ईडी या केंद्रीय सरकारी संस्थेमार्फत पीएफआय संघटनेच्या लोकांना अटक केल्याच्या निषेधार्थ मोठमोठ्याने घोषणा दिल्या. या ठिकाणचा रस्ता अडवून नागरिक व वाहनांना अडथळा निर्माण केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात (PFI Pune) आला आहे. बंडगार्डन पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे.