- September 25, 2022
- No Comment
डी.वाय.पाटील हॉस्पिटल:पेशंटचे ऑपरेशन करा म्हणत डॉक्टरच्या थेट कानफाडात
पिंपरी: पेशंटचे ऑपरेशन जागेवर करा, त्याला कुठेही हालवायचे नाही म्हणत थेट डॉक्टरच्याच कानाखाली दिल्याचा प्रकार पिंपरी येथील डी.वाय.पाटील मेडीकल हॉस्पिटलमध्ये घडला आहे.
याप्रकरणी डॉक्टर शिवाप्पा रविंद्र देवरमनी (वय 26, रा. डी.वाय.पाटील मेडीकल हॉस्पिटल बॉईज हॉस्टेल) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दुर्गेश राजन पुराणिक (वय 28, रा.मोशी) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचे आजोबा कालीदास गजानन पुराणिक (वय 96) हे उपचारासाठी डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्या कमरेमध्ये फ्रॅक्चर असल्याने त्यांच्यावर ऑपरेशन करायचे होते. मात्र, आरोपीने फिर्यादी डॉक्टरला पेशंटला कोठेही हालवायचे नाही. गरज असेल तर तुमच्या कार्डीयाक डॉक्टरांनाच तुम्ही येथे बोलवा म्हणून जोरजोरात शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या कानाखाली मारली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.