• September 25, 2022
  • No Comment

ओळख दीली नाही म्हणून स्वयंघोषित भाईने मारहाण करत लुटले, आरोपी गजाआड

ओळख दीली नाही म्हणून स्वयंघोषित भाईने मारहाण करत लुटले, आरोपी गजाआड

रहाटणी: तुम्ही मला ओळखता का नाही म्हणताच मारहाण करत दोघांना लुटल्याचा प्रकार काळेवाडी येथील रहाटणी फाटा परिसरात घडली. आरोपीस वाकड पोलिसांनी अटक केले आहे.

विकी रामप्रसाद मल (वय 42 रा.थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर संदेश रमेश गायकवाड (वय 30 रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत रहाटणी फाट्यावरील राजधानी हॉटेल जवळ थांबले होते. यावेळी आरोपी तेथे आला व त्याने सिगारेट आहे का विचारले, तसेच फिर्यादी यांना तुम्ही कुठले आहात यावर फिर्यादी यांनी आम्ही इथलेच असे सांगितले. तुम्ही इथले असाल तर मला ओळखता का यावर फिर्यादींनी नाही असे उत्तर दिले. तुम्ही इथलेच आहेत तर तुम्ही मला ओळखत नाही? मी या एरियाचा भाई आहे विकी मल भाई असे बोलून त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व लाकडी फळीन आणी लाथा बुक्क्याने मारहाण करून फिर्यादी व त्यांच्या मित्राजवळील 9 हजार रुपयांचे दोन मोबाईल हिसकावून घेतले.

याप्रकरणी तक्रार करताच वाकड पोलिसांनी या विकीभाईला बेड्या ठोकल्या असून संबंधीत भाई मजुरी करून पोट भरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

 

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *