- September 25, 2022
- No Comment
खराडी: मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना लुटणारी टोळी गजाआड
खराडी: खराडी येथील चौधरी वस्ती परिसरात 4 सप्टेंबर रोजी तीन आरोपींनी मोबाईलवर बोलत जाणाऱ्या एका वयस्कर नागरिकावर कोयत्याने वार करून त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावून नेला. या घटनेतील तीनही आरोपींना चंदननगर पोलिसांनी गजाआड केले आहे.
विनायक राजू अहिवळे (वय 21 रा. मुंढवा), वैभव शैलेश गायकवाड (वय 22 रा. केशवनगर, मुंढवा), आदित्य नितीन बद्द्प (वय 21 रा.खडकी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी प्रमाणे इतर भागात ही असे प्रकार घडत असल्याने पोलीस त्यांच्या मागावर होतीच. हा तपास करत असताना चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस अमंलदार सुरज जाधव यांना खबर मिळाली की, तीन इसम हे चोरीचा मोबाईल विकण्यासाठी खऱाडीतील जॅकवेल ब्रीजजवळ येणार आहेत. त्यानुसार पोलिस ब्रीजजवळ गेले, मात्र पोलिसांना पहाताच ते त्यांच्या दुचाकीवरून पळून जाऊ लागले. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्य़ात घेतले यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी त्यांना पोलीस ठाणे येथे येवून पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. चोरी करत असताना वयस्कर नागरिकाने त्यांच्यातील एकाला पकडून ठेवले होते म्हणून त्यांनी नागरिकाच्या हातावर कोयत्याने वार केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबाईल, कोयता दुचाकी असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.