• September 25, 2022
  • No Comment

चिखली:किरकोळ वादातून एकावर चाकूने वार

चिखली:किरकोळ वादातून एकावर चाकूने वार

चिखली: किरकोळ कारणावरून एकाला चाकूने हातावर व पोटावर वार करण्यात आले आहेत. ही घटना चिखलीतील कृष्णानगर भाजी मंडई जवळ घडली.

याप्रकरणी कैलास दशरथ खाडे (वय 23 रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विनायक राजु ननवरे (वय 21 रा. चिखली) व दोन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यातील विनायक याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला रिक्षाला हात लावू नको म्हणत आरोपीने भांडणास सुरुवात केली व याच भांडणात त्याने फिर्यादीच्या हातावर व पोटावर चाकूने वार करत गंभीर जखमी केले आहे. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आहे. यावरून आरोपीला अटक केली असून चिखली पोलीस याचा पुढिल तपास घेत आहेत.

 

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *