- September 27, 2022
- No Comment
सोमाटणे फाटा:सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकुळ, पायी जाणाऱ्या तरूणीची सोनसाखळी लंपास
सोमाटणे फाटा: सोमाटणे फाटा येथे पायी जाणाऱ्या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयांनी जबरदस्तीने हिसकावून नेली.
याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता सोमाटणे फाटा येथून परंदवडी रोडने चालत जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची 12 ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली.
तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.