- September 27, 2022
- No Comment
सोशल मिडीयाचा दुष्परिणाम, अल्पवयीन मुलीचे फोटो एडीट करून अश्लील फोटो सोशल मीडियावर वायरल
बावधान: अल्पवयीन मुलीचे फोटो एडीट करून अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करून त्याखाली अश्लील मजकूर लिहिला. हा प्रकार 16 मार्च 2020 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी बावधन आणि नवी मुंबई येथे घडला.
स्वप्नील राजेंद्र पाटील (रा. घाटकोपर, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचे फोटो त्याच्या फेसबुकवर एडीट करून अपलोड केले. फिर्यादींच्या मुलीचे अश्लील फोटो बनवून त्याखाली अश्लील मजकूर लिहून तो पोस्ट करत फिर्यादीची आणि त्यांच्या मुलीची बदनामी केली. त्यांनतर आरोपीने फिर्यादींना त्यांच्या घरी येऊन धमकी व शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.