- September 27, 2022
- No Comment
पुणे: झेड ब्रिजखाली तरुणाचा धारदार शस्त्राचे वार करून निर्घृण खून
पुणे: पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झेड ब्रिज परिसरात एका 35 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राचे वार करून निर्घृण खून करण्यात आलाय. खून केल्यानंतर या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात टाकण्यात आलाय. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.
गणेश सुरेश कदम (वय 35) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेश कदम हा लॉन्ड्री चालक आहे. शनिवार पेठेत त्याची लॉन्ड्री आहे. रविवारी सायंकाळी फोन आल्यानंतर तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही. कुटुंबियांनी रात्री शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो सापडला नाही. त्यानंतर आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी येऊन पाहणी केली असता हा मृतदेह गणेश कदम याचा असल्याचे निदर्शनास आले.
डेक्कन पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.